Nadtal

Dhol and Tasha is the sound that connects every Maharashtrian with Marathi culture and holds them to the Marathi soil. That sound is so magical that your blood will swell with pride and the legs will tremble by listening to it. In earlier times, the drum was an instrument played to express joy after winning a war.

On the occasion of Ganeshotsav in 1960s, Appaji Pendse, the founder of Gnyanprabodhini Sanstha in Pune, first established the Dhol Tasha Lezim Team.

Dhol tasha Lezim squads work in a highly disciplined manner and under precise management. By witnessing the performance of the beautiful combination of Dhol, tasha and the lezim is a joy to behold and simply must be experienced.

Lezim is famous as a folk dance since the time of Shivaji Maharaj. In those days, lezim was played on a Halgi instrument on every auspicious occasion, whether it was a celebration or success in war or the homecoming of victorious heroes. Lezim is also a vigorous physical exercise and drill. Many social reformers like Lokmanya Tilak also encouraged the folk dance of Lezim.

Lezim performance is usually consists of lezim dancers in two rows, repeating a sequence of steps, changing the steps every few beats. Thus, a 5-minute lezim performance can consist of 25 different steps.

प्रत्येक मराठी माणसाला मराठी संस्कृतीशी जोडून ठेवणारा आणि मराठी मातीशी धरून ठेवणारा नाद म्हणजे ढोल ताशा . तो नाद ऐकून अभिमानाने रक्त उसळले नाही आणि पाय थिरकले नाहीत तरच नवल. पूर्वीच्या काळी युद्ध जिंकून
आल्यावर आनंद व्यक्त करायला वाजवले जाणारे वाद्य म्हणजे ढोल.

शिवाजी महाराजांच्या काळापासून लेझीम हे एक लोक नृत्य म्हणून प्रसिद्ध आहे. त्याकाळात हलगी वाद्यावर ठेका धरून प्रत्येक मंगल प्रसंगी लेझीम खेळले जायचे, मग तो उत्सव असो की युद्धात मिळवलेलं यश असो किंवा विजय मिळवून आलेल्या शूर वीरांचं घरी परतणं असो. लोकमान्य टिळकांसारख्या अनेक समाज सुधारकांनी देखील लेझीम ह्या लोक
नृत्याला खूप प्रोत्साहन दिले होते.

१९६० च्या दशकात गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे संस्थापक अप्पाजी पेंडसे ह्यांनी सर्वप्रथम ढोल ताशा पथकाची स्थापना केली. श्रीगणेशानेच मान्यता दिलेल्या ह्या वाद्याला मंगल वाद्य असेही म्हणतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अशी अनेक ढोल ताशा पथके आहेत . अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि अचूक व्यवस्थापनात ढोल ताशा पथके कार्यरत असतात. ढोल आणि ताशांचा सुंदर संगम आणि त्या ठेक्यावर केलेले लेझीम हे बघण्यातला
आनंद अलौकिक असतो आणि तो फक्त अनुभवायचा असतो.

महाराष्ट्रातल्या अनेक शाळांमध्ये ही परंपरा जपण्याचा प्रयत्न गेले कित्त्येक वर्ष यशस्वीपणे चालू आहे. गणपतीच्या आधी काही महिने ढोल ताशा आणि लेझीम च्या तालमी शाळांमध्ये सुरु होतात आणि सगळी मुलं/ मुली जल्लोषात गणपतीच्या मिरवणुकीत ढोल ताशा आणि लेझीमच सादरीकरण करतात. त्यांच्यातली ऊर्जा पाहून थक्क व्हायला होत,. बाप्पावरच्या प्रेमापोटी ऊनपाऊस काहीही असो ही सगळी पथकं अगदी गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत फक्त तल्लीन होऊन त्यांचं काम करत असतात. त्यांच्यातला हा जोश खूपच कौतुस्कास्पद वाटतो. जणू काही बाप्पा त्यांच्याकडून हे करवून घेतो.

ढोल ताशा आणि लेझीम पथकांना आज जगात खूप प्रसिद्धी मिळाली आहे . सातासमुद्रा पलीकडे असूनही तरुण वर्गापर्यंत हा अनुभव पोचवण्याचा आणि हा अभिमान रुजवण्याच्या प्रयत्नात “नादताल” ही NonProfit Organisation स्वतंत्रपणे कार्यरत आहे . फक्त ढोल ताशा वाजवून नव्हे, तर आज सादर झालेल्या शिवजन्म अशा छोट्या ऐतिहासिक नाट्य नाट्य प्रदर्शनाद्वारे देखील तरुण वर्गाला आपल्या मातीशी धरून ठेवण्याचा प्रयत्न “नादताल” करत आहे.

ढोल ताशा लेझीम ही वाद्ये छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे अशा थोर योध्यांना दिलेली मानवंदना आहे. ही वाद्ये म्हणजे विजय समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहेत.ढोल ताशा आणि लेझीम पथके समाजामध्ये देव देश आणि धर्माप्रती असेलेली भावना जोपासण्याचं पुण्याचं कार्य करत आहेत. आपली परंपरा जपणाऱ्या जगातल्या सगळ्या ढोल ताशा
लेझीम पथकांना आमचा मानाचा मुजरा. ही परंपरा अशीच अविरत चालू राहावी हीच ईश्वर चरणी प्रार्थाना.

Meet Our Team

Prashant Sawant

President

Yogesh Salvi

Treasurer

Sujit Dongre

Secretory

Rupali Patil

Director

Uday Salvi

Director

Sachin Pisolkar

Director

Sujeet Dongare

Director

Amruta Phadke-Vedak

Director

Sanjay Gadre

Director